जितुंर तालुक्यातील निवळी येथे महिलेसह दोघा मुलांचा तलावात बुडून मृत्यू
सहसंपादक/मनोज टाक
जिंतूर तालुक्यातील बोरी पोलिस ठाणे हद्दीतील निवळी खिस्ते येथील करपरा जलाशयात मंगळवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास नसरीन रसूल पठाण या विवाहित महिलेसह दोन मुलांचा बुडून मृत्यु झाला.या जलाशयात महिला आणि दोन मुले बुडाल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी लगेचच धाव घेत शोध घ्यायला सुरुवात केली. पोलिस आणि प्रशासनालाही याबाबत कळविण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी सांयकाळी उशिरा दोन मुलांना बाहेर काढण्यात यश मिळविले. परंतु तोपर्यंत त्या दोघांचा मृत्यू झाला होता. रात्रीची वेळ झाल्याने शोधमोहीम बंद करण्यात आली.आज बुधवारी पुन्हा शोधमोहीम सुरू केली असता त्या महिलेचाही मृतदेह मिळून आला.या घटनेचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही, या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नाही.