परभणी शहरातिल ज्येष्ठ पञकार हमिद मलिक यांचे निधन

परभणी शहरातील ज्येष्ठ पत्रकार हमीद मलीक यांचे निधन परभणी : शहरातील औरंगाबाद टाईम्स उर्दु दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार हमीद मलीक यांचे हृदय विकाराच्या झटक्याने रात्री 12 च्या सुमारास निधन झाले . त्यांचे अत्यंसंस्कार 03 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 1.30 वा . काद्राबाद प्लॉट येथील करण्यात येणार आहे . त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले , दोन मुली , सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे . ज्येष्ठ पत्रकार हमीद मलीक हे मागील चाळीस वर्षांपासून सक्रीय पत्रकारीता करत होते . त्यांनी स्वतःचे उर्दु साप्ताहीकही सुरु केले होते व नंतर औरंगाबाद टाईम्स या वृत्तमान पत्रात 25 वर्षासून ते काम करत होते . पत्रकारीतेच्या माध्यमातून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केलेले आहे . हमीद मलीक हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते लहान मोठया पर्यंत सर्वांना ते आदराने मिळत होते . त्यांच्या अकाली जाण्याचे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *