परभणीत डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गरोदर महिलेचा मृत्यू
सहसंपादक मनोज टाक
परभणी : दि.1 येथील जिल्हा स्त्री रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या पाथरी येथील सौ.पुजा भरत गिरी वय 20 वर्षीय महिलेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असल्याची घटना शनिवार, दि.1ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 3 वाजन्याच्या सुमारास घडली यावेळी नातेवाईकांनी संबंधीत डॉक्टांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय महिलेचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भुमिका घेतल्याने तनावाचे वातावरण निर्माण झाले होते या संदर्भात मृत महिलेच्या भावाने संबंधीत डॉक्टर विरोधात पोलिसांत तक्रार देणार असल्याचे सांगितले याबाबत अधिक माहिती अशी की, पाथरी येथील आदर्श नगर मधील रहिवाशी असलेली सौ.पुजा भरत गिरी सात महिन्यांची गरोदर होती अचानक पोटात दुखण्यास सुरूवात झाल्याने पाथरी येथील खाजगी रूग्णालयात नेण्यात आले परंतू डॉक्टरांनी या महिलेला उपचारासाठी परभणी येथील जिल्हा स्त्री रूग्णालयात पाठवले होते परभणी येथील जिल्हा स्त्री रूग्णालयात दाखल झाल्यानंतर शनिवारी दुपारी 1.वाजन्याच्या सुमारास सौ.पुजा गिरी यांचा बी पी वाढला चाललं होतं यावेळी पुजा यांच्या नातेवाईक महिलांनी तेथील परीचारिका व डॉअस्मीता मोरे यांना माहिती दिली परंतू डॉक्टर व परीचारिकांनी महिलांनी प्रतित्तुर देत तुझी प्रसुती झाली नाही का असा उलाट सवाल केला त्यानंतर 2 वाजन्याच्या सुमारास बी पी आनखी वाढल्यानंतर सौ. पुजा यांच्या तोंडाला फेस आल्याचे सौ.पुजा यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना सांगितले त्यानंतर डॉ मोरे यांनी सौ.पुजा यांची तपासणी सुरू केली व फिजीशीयन डॉ अतुल जाधव यांना कॉल करून माहिती दिली दरम्यान दुपारी 3 वाजता पुजा यांचा मृत्यू झाला त्यानंतर दुपारी 3-45 मि. डॉ अतुल जाधव आल्याने नातेवाईक संतप्त झाले होते यावेळी नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात करीत संबंधीत डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली दरम्यान या प्रकरणी मृत महिला सौ.पुजा यांचा भाऊ आशुतोष दत्त पुरी रा.काकडे नगर परभणी यांनी संबंधीत डॉक्टर विरोधात पोलिसांत तक्रार देणार असल्याचे बोलताना सांगितले