मानवत,येथे लहू क्रांती संघर्ष सेना,संघटनेची बैठक संपन्न

परभणी प्रतिनीधी मोहन कांबळे

मानवत येथे लहू क्रांती संघर्ष सेना, या सामाजिक संघटनेची जिल्हास्तरीय बैठक दिनांक25 सप्टेंबर रविवार रोजी संपन्न झाली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लहू क्रांती संघर्ष सेनाचे महाराष्ट्र सचिव मा.किशोर गवारे साहेब, होते,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून,संस्थापकअध्यक्ष, मा. राजु कसबे साहेब , या बैठकीला प्रमुख उपस्थित प्रदेशाध्यक्ष, मा. नितिन भाऊ रोकडे महा,संघटक मा.अशोक तुरूपझाडे मराठवाडा सचिव शेषेराव घोडे मराठवाडा संघटक कैलास काळे परभणी जिल्हा अध्यक्ष सुनिल गवारे साहेब,संघटनेचे आदी पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत संघटनेच्या नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये परभणी युवा जिल्हाध्यक्ष पदीअक्षय भाऊ काळे,परभणी युवा जिल्हा उपाध्यक्ष पदी बाळू सौदागर, परभणी जिल्हा उपाध्यक्ष पदी बाबासाहेब खंदारे, पाथरी तालुकाध्यक्ष पदी किशोर घाटूळ, पाथरी तालुका उपाध्यक्ष पदी जयवंत कांबळे,तर मानवत ऊसतोड कामगार तालुकाध्यक्ष पदी लक्ष्मण आरसाड,यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहेयावेळी, संघटनेचे अध्यक्ष राजु कसबे साहेब यांनी समाजाच्या अनेक प्रश्नावर म्हणजे,स्मशानभूमी चे प्रश्न, गायरान धारकांचे प्रश्न, समाजावार होणाऱ्या अन्याय, अत्याचााविरोधात आवाज उठविणार,समाजाला न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार, समाजाला अ, ब,क,ड.वर्गवारी आरक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी लहूक्रांती संघर्ष सेना या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार,अश्या सामाजिक प्रश्नावर मार्गदर्शन करण्यात आलेसंघटनेचे सचिव किशोर गवारे साहेब यांनी समाजाच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी आपली संघटना तत्पर आपल्या सोबत असेल, आपल्या समाजाचा राजकीय क्षेत्रात कुठंही विचार केला जात नाही,कारण आपली एकता नाही,संघटन नाही, आपला समाज राजकीय क्षेत्रापासून कोसोदुर आहे,आपला समाज राजकीय क्षेत्रात उतरला पाहिजे,संघटित झाला पाहिजे, गायरान धारकांना त्यांच्या जमिनीची सातबारा उतारा मिळाल्या पाहिजे,यासाठी आम्ही लहूक्रांती संघर्ष सेना या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत,तसेच संघटनेच्या वतीने परभणी जिल्ह्यात एक “मातंग समाज सत्ता संपादन परिषद” चे आयोजन करण्यात आले आहे. आणि या मातंग समाजाच्या सत्ता संपादन परिषदेला जिल्ह्यातून आपण आपली ताकत दाखवून,आपल्या समाजाला राजकीय क्षेत्रात कस स्थान मिळेल यासाठी आपल्याला एकत्र येणं काळाची गरज आहेया बैठकीचे प्रस्थावित लहूक्रांती संघर्ष सेना,मरा,संघटक कैलास काळे यांनी केले.यावेळी बैठकीला संघटनेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते, यामध्ये परभणी,मानवत, पाथरी,सोनपेठ,गंगाखेड,पालम, पूर्णा,जिंतूर,सेलू सर्व तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते व ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होतेयामध्ये संजय चौरे,अशोक पांजगे, सुंदर गायकवाड,सतिश गवारे,रामेश्वर गायकवाड,सुरेश काळे,सुरेश खंदारे,संभाजी गायकवाड,लखन शिंदे, अमोल सुर्यवंशी, रामभाऊ कांबळे, पवन गायकवाड,अनिल सुर्यवंशी, श्रीरंग सोनाजी कांबळे,पांडुरंग गायकवाड,अनिल आठवे,महादेव कांबळे,लक्ष्मण रोकडे,रमेश साळवे, संतोष अंभुरे, अशोक गायकवाड,सुरेश भिसे,आदी कार्यकर्ते उपस्थित होतेबैठकीचे आयोजन लहू क्रांती संघर्ष सेना, मानवत तालुकाध्यक्ष गणेश कांबळे आणि युवा तालुकाध्यक्ष कृष्णा भाऊ गायकवाड यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *