ग्रामपंचायत बोरी व पशुवैद्यकिय दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लम्पी या पशुरोगाचे मोफत लसीकरण शिबिराचे उद्दघाटन करतांन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मा.अजय भैय्या चौधरी,

जिंतूर तालुका प्रतिनिधी/ मनोज टाक

जिंतूर: तालुक्यातील बोरी येथे आज दि.21ग्रामपंचायत बोरी व पशुवैद्यकिय दवाखाना व माध्यमातून लंपी या जनावरांवरील आजारावर खबरदारीचा उपाय म्हणून,गावातील जनावरांना लसीकरण करण्यात यावी दरम्यान रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना संदर्भात ग्रामपंचायत बोरी व पशुवैद्यकिय दवाखाना वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवणे, दररोज संध्याकाळी लिंबाच्या पाल्याचा धूर करणे इत्यादी उपायोजनांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी शिबिराचे उद्दघाटक जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मा.अजय भैय्या चौधरी, यावेळी उपस्थित सरपंच प्रदीप चौधरी,उपसरपंच शेख रफीक,डॉ शाहेद देशमुख,राहुल कनकुटे,सखाराम सोगे,इमरान खान,खिझर कुरेशी,करुण नागरे, शशिकांत चौधरी गणेश चौधरी यांच्यासह पशुपालक व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.