मनमाड शहरातील नद्यांना पूर, पालिकेतर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा
नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल
बातमी आहे नाशिक जिल्ह्यातून नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरामध्ये दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी रविवारी दुपारपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने मनमाड शहरातील रामगुळना पांझण नदी यांना पूर आल्याने नागरिकांना पुलावरून पाणी जात असल्याने वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. मनमाड शहरातील नदीकाठच्या लोकांना मनमाड पालिका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून मनमाड गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजीत सिंग यांनी नदीकाठच्या लोकांना गुरुद्वारात राहण्याची व्यवस्था केली. पाऊस हा मुसळधार असल्याने लोकांना आपापली जनावरे सुद्धा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावे लागले. हा आकार माजवला असून तब्बल पाच ते सहा असा पासुन सुरू असलेला पाऊस हा थांबण्याचे नाव घेत नसल्याने रात्री नद्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने कोणतीही अडचण आल्यास मनमाड गुरुद्वाराशी संपर्क करावा अशी आवाहनही गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजितसिंग यांनी नागरिकांना केले आहे. मनमाड शहरातील रामगुणा नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांना सूचित करण्यात येते की दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी दुपारपासून मनमाड शहरात आणि धरणात पान रोड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असल्याने व आज दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी सोमवारी देखील मुसळधार पाऊस असल्याने नदीला पूर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांनी तात्काळ नदी काठापासून दूर जावे. अशा नागरिकांना मनमाड शहरातील गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजीत सिंग यांनी नागरिकांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली असून त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असेही मनमाड येथील गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजीत सिंग यांनी आव्हान केले आहे.