स्वदेशी न्यूज पोर्टलचा ६ वा वर्धापन दिन सोहळा थाटात संपन्न

जिंतूर तालुका प्रतिनिधी/ मनोज टाक

जिंतूर: मागील सहा वर्षापासून परभणी जिल्ह्यासह राज्यभरात, तत्परतेने बातम्या पोहोचवून, वाचकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण करणाऱ्या स्वदेशी न्यूज पोर्टलचा ६ वा वर्धापन दिन सोहळा, रविवार दि.१८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जिंतूर शहरातील माजी सैनिक मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी शिक्षण, प्रशासन, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांना स्वदेशी न्यूज पोर्टलच्या वतीने स्वदेशी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार, ज्येष्ठ पत्रकार राजेभाऊ नगरकर, ज्येष्ठ पत्रकार एम. ए. माजिद, आदर्श शिक्षक महंमद एकबाल शेख इस्माईल, केंद्रीय प्राथमिक शाळा इटोली येथील शिक्षक भास्कर जुमडे, नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी रेहान खान अब्दुल रउफ खान पठाण, जेईई परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी पारस विजय टाक यांचा स्वदेशी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार प्रदीप कोकडवार यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार रत्नदीप शेजावळे यांनी केले. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थित नागरिकांसाठी आयोजकांच्या वतीने स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वदेशी न्युज पोर्टलचे, मुख्य संपादक अजमत पठाण, कार्यकारी संपादक भागवत चव्हाण, सय्यद फिरोज भाई, संदीप माहूरकर, बाळासाहेब रामपूरकर, महेश देशमुख, खयूम भाई, रहीम भाई, दिलीप माघाडे, मनोज टाक, शेख हनिफ भाई, सचिन रायपत्रीवार, माबुद खान, रामप्रसाद दराडे रामभाऊ रेघाटे व सर्व पत्रकार बांधव इलेक्ट्रॉनिक मिडिया आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *