सेलू शहरातील दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार

कौसडी.प्रतिनिधी/दत्तराव काळे

परभणी जिल्ह्यातील सेलू शहरातील अतिशय संताप जनक दुर्देवी घटना घडली आहे. शहरातील दहा वर्षाच्या एका बालिकेला मोटरसायकलवर जबरदस्तीने पळून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची संताप जनक घटना घडली असल्याची माहिती समोर आले आहे. सेलू पोलीस ठाण्यात त्या अल्पवयीन मुलीच्या आईने सोमवारी सायंकाळी एक तक्रार दाखल केली; त्याद्वारे आपली दहा वर्षीय दहा महिन्याची मुलगी व बहिणीचा मुलगा या दोघांना अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकलवर पळून नेले; जिंतूर तालुक्यातील कौसडी फाट्यावर मुलास मारहाण करून ढकलून दिले तर आपल्या अल्पवयीन मुलीवर कोक शिवारात त्या दोंघा अज्ञात व्यक्तींनी बलात्कार केला असे नमूद केले . दरम्यान सेलू पोलिसांनी मंगळवारी पहाटे या घटनेबद्दल गुन्हा दाखल केला आहे ;अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी रवाना झाले आहेत. सेलू पोलिसांनी या प्रकरणात जलद गतीने तपास सुरू केला आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास भाग्यश्री पुरी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.