खा हेमंत पाटील यांची साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे सदिच्छा भेट

प्रतिनिधी :- अजहर शेख हादगावकर

आदरणीय हेमंतजी पाटील खासदार हिंगोली यांनी मा. आमदार मोहनजी भाऊ फड यांचे समवेत दि. 31.8.2022 रोजी साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे सदिच्छा भेट दिली. परमपूज्य साईबाबांचे भक्तिभावाने दर्शन घेतले. साईबाबांच्या जन्मस्थाना बद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नाके कुलकर्णी यांनी त्यांना माहिती दिली. पाथरी विकास आराखड्याबाबत संस्थेचे सचिव तथा कार्यकारी विश्वस्त एडवोकेट अतुल चौधरी यांनी माहिती दिली. आदरणीय हेमंतजी पाटील खासदार महोदय यांनी “साईबाबांच्या जन्मस्थानाचा दर्शन घेण्याचा योग आला हे क्षेत्र ईतर देवस्थाना प्रमाणेच विकसित झाले पाहिजे .साईबाबा हे करोडो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. येथील विकास आराखडा मंजूर करण्यासंदर्भात शासन दरबारी मी प्रयत्न करीन. धार्मिक पर्यटना द्वारे मराठवाड्यातील सर्व तीर्थक्षेत्रे जोडण्या संदर्भात मी आग्रही आहे . गावाच अर्थकारण सुधारले जाईल. बेरोजगारांना काम मिळेल. येथे येऊन मनःशांती मिळाली ” असे मनोगत व्यक्त केले. साईबाबा जन्मस्थान मंदिराच्या व्यवस्थापन मंडळाच्यावतीने संस्थेचे सचिव तथा कार्यकारी विश्वस्त अतुल चौधरी यांनी हेमंत पाटील खासदार महोदय ,मा. आमदार आदरणीय मोहन जी फड यांचा शाल, श्रीफळ ,प्रसाद मोमेन्टो देऊन यधोचीत सत्कार केला. याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी अधिकारी एडवोकेट मुकुंद चौधरी, शिवराज नाईक, जयंत चिटणीस , उद्धव नाईक एडवोकेट कोंत वगैरे मान्यवर उपस्थित होते . अशी माहिती संस्थेचे कार्यकारी अधिकारी एडवोकेट मुकुंद चौधरी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *