विजेच्या ताराला चिकटून मृत्यू झाल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

जिंतूर तालुका प्रतिनिधी/मनोज टाक

जिंतूर तालुक्यातील हलविरा शिवारात विजेचा जबर शॉक लागून एका व्यक्तीच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी एक जणांवर चारठाणा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितास अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की जिंतूर तालुक्यातील हलविरा परिसरात गुरूवारी (दि.२५) विद्युत तारांची दुरुस्ती करण्यासाठी चारठाणा येथील एकनाथ इंगळे व जयानंद निकाळजे हे दोघेजण गेले होते. यावेळी एकनाथ इंगळे यांनी जयानंद निकाळजे यास विद्युत खांबावर पाठविण्यापुर्वी महावितरणकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती. केवळ विद्युत डी.पी. तील फ्युज काढून विद्युत तारा ओढण्याचे काम करीत असताना तार तुटून मुख्य विद्युत वाहिनीच्या ताराला स्पर्श झाल्याने चारठाणा येथील जयानंद सखाराम निकाळजे (वय ४२ वर्ष ) हा तारेला चिकटून जागीच मृत्यु पावल्याची घटना घडली होती. दरम्यान, या प्रकरणी मयताची पत्नी प्रजावती जयानंद निकाळजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एकनाथ इंगळे याच्याविरूद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितास अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड हे करीत आहेत.

त्या आरोपीला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

या प्रकरणातील आरोपी एकनाथ इंगळे यास चारठाणा पोलीसांनी शुक्रवारी (दि. २६)
जिंतूर न्यायालयासमोर हजर केले असता गुरूवार (दि.८-९-२२) पर्यंत जिंतूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *