दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली जिल्हा आपच्या वतीने विद्यार्थ्यांना पेन वही आणि खाऊचे वाटप
आज दिनांक 16 ऑगस्ट तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील मतिमंद विद्यालय व श्री साई निवासी मतिमंद विद्यालय कळमनुरी येथे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सुप्रिमो श्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे या कार्यक्रमांमध्ये अरविंद भाई केजरीवाल यांचे आयुष्य वाढो आणि देश भ्रष्टाचार मुक्त आणि सामान्य माणसाला शिक्षण आरोग्य पाणी वीज यासारख्या मूलभूत गरजा मिळण्याकरिता आम आदमीचे सरकार देशांमध्ये येण्याची काळाची गरज आहे यासाठी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेतील मतिमंद विद्यार्थ्यांना आम आदमी पार्टी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने विद्यार्थ्यांना वही पेन आणि खाऊचे वाटप करण्यात आले आहेया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पठाण सर प्रमुख पाहुणे म्हणून श्री मोगावे सर आणि आम आदमी पार्टी हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष गोपाल ढोणे उपाध्यक्ष तथागत सूर्य तळ कळमनुरी तालुका ग्रामीण चे अध्यक्ष डॉक्टर मारुती जाधव तालुका कळमनुरी चे शहर तालुकाध्यक्ष श्याम भाऊ उदावंत साहेबराव काकडे नदीम पठाण रिजवान आतार मोहम्मद साजिद रामा साखरे बालाजी शहाणे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते शाळेचा स्टाफ व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते