सेनगांवात भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त ७५ तिरंगा ध्वजाचे वाटपअ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचा उपक्रम
सेनगांवात भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त ७५ तिरंगा ध्वजाचे वाटपअ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचा उपक्रम
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाच्या माध्यमातुन पंतप्रधान नरेंदजी मोदी यांच्या संकल्पनातुन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने दि.१२ आँगस्ट शुक्रवार रोजी नागरीकांना ७५ तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप करण्यात आले.अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती,ब्रिक्स ह्युमन राईट मानव अधिकार मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२ आँगस्ट शुक्रवार रोजी शहरातील समितीच्या संपर्क कार्यालयात नागरीकांना ७५ तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप करण्यात आले आणि उपस्थित महिला पदाधिका-यांनी पुरुष पदाधिका-यांना राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.यावेळी मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीत तिडके,किसान विभाग जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख,हिंगोली जिल्हा महिला अध्यक्ष वंदना थिट्टे,महिला जिल्हा कार्याध्यक्षा आशाताई घोडके,शे.सामीना ताई,रुपाली थिट्टे,जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ नरवाडे,तालुकाध्यक्ष संतोष टेकाळे,हिंगोली जिल्हा प्रसिध्दीप्रमुख पत्रकार विश्वनाथ देशमुख,तालुका कोषाध्यक्ष सखाराम आकले,गौत्तम सपकाळ,ज्ञानदेव खिल्लारे,आश्रुबा इंगोले आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.