घरकुलचे हप्ते लाभार्थीना त्वरित टाका अन्यथा आंदोलन भा.ज.पा.चे निवेदन

जिंतूर शहर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

पंतप्रधान घरकुल आवास योजने अंतर्गत शहरात सुमारे तिन हजार लाभार्थीना घरकुल मंजूर झाले आहे. पण न.प. कडून लाभार्थींच्या खात्यात रक्कम नियमित टाकली जात नसल्याचे आरोप करून लाभार्थींच्या खात्यात त्वरित हप्ते टाकण्यात यावे अन्यथा आठ दिवसा नंतर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा अल्पसंख्याक जिंतूर तालुकाध्यक्ष म. एजाज यांनी न.प. मुख्याधिकारी यांना आज निवेदन देउन दिला घरकुल योजना अंतर्गत घरकुल ची मंजुरी मिळाल्यानंतर आपले रहाते घराचे पक्के बांधकाम करण्यासाठी घरे पाडली व स्वत: भाड्याच्या घरात रहाण्यासाठी गेले पण घरकुलचा हप्ता न.प. कडून वेळेवर खात्यात टाकला जात नसल्याने लाभार्थीना मोठ्या अडचणी ला समोर जावे लागते. काही लाभार्थीना एक तर काहींना दोन असे हप्ते खात्यावर टाकण्यात आले. पण नंतर पुढे न.प. कडून दिरंगाई होत आहे या मुळे भरपावसात लाभार्थीना मोठा त्रास सहन करावा लागतो लाभार्थी न.प . कार्यालयात चकरा मारून मारून थकले प्रत्येक वेळेस लवकरच टाकण्याचे अश्वासन नप कडून दिले जाते पण महीने लोटले तरी नप कडून अश्वसनाची पुर्तता होत नाही न.प. मुख्याधिकारी यांनी या कडे लक्ष देउन लाभार्थीच्या खात्यावर त्वरित हप्ते टाकावे अशी मागणी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा चे तालुकाध्यक्ष म. एजाज यांनी केली अन्यथा आठ दिवसानंतर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही करण्यात आला मुख्याधिकारी यांना आज दिलेल्या निवेदनावर भाजपाचे तालुकाध्यक्ष लक्षमण बुधवंत, म. एजाज, विलास भंडारे, मनोहर सातपुते, सचिन रायपत्रीवार यांच्यासह अनेक नागरींकच्या स्वाक्षऱ्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *