कळमनुरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बालाजी जाधव यांचे जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन
हिंगोली जिल्हा मधील मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्याची पिकाचे मोठे नुकसान झाले आहे ,कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुबार पेरणी होऊन सुद्धा शेतकऱ्यांना हाती कुठली पिक आले नाही, शेतकऱ्यांच्या शेतात पावसाच्या पाण्यामुळे पिके खरडून गेली आहेत, आज बऱ्याच शेतात पाणी साचले आहे त्यांना तलावाचे स्वरूप मिळाले आहेत, तसेच काही भागात औढ्याच्या काठावर शेतकऱ्याचे पिक खलडुन गेले आहे, त्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे, कळमनुरी तालुक्यात सरसगट ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक तालुका तालुका उपाध्यक्ष बालाजी जाधव यांनी निवेदना मार्फत केली आहे