राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याविषयी अपशब्द बोलल्याबद्दल जिंतूरात निषेध आदिवासी युवक संघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
जिंतूर तालुका/प्रतिनिधी/मनोज टाक
भारताच्या राष्ट्रपतीपदी, आदिवासी समाजातून आलेल्या द्रौपदी मुर्मु यांची निवड झाली आहे. त्यांचे सध्या आदिवासी समाज बांधवातून सर्वत्र स्वागत होत असतानाच त्यांच्याबद्दल काँग्रेस नेते रंजन चौधरी यांनी संसद भवनात अपशब्द वापरल्यामुळे तमाम आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.या घटनेचा जिंतूर येथे आदिवासी समाज बांधवांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. रंजन चौधरी यांची पाठराखण करणाऱ्या काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी, पक्षाध्यक्षा या नात्याने जनतेची व संसदेची माफी मागावी अन्यथा आदिवासी समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आज शुक्रवारी आदिवासी युवक संघाच्या वतीने देण्यात आला. याबाबत जिंतूर तहसीलदार यांच्यामार्फत, जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले.या निवेदनावर आदिवासी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष माधवराव घोगरे, भानुदास वाकळे, देवराव देवकर, रामजी चिभडे, देविदास चिभडे, मैनाजी चिभडे, सुरेश मुळे, शिवाजी सोनुळे,एकनाथ वाळके, कांतीलाल साबळे आदींच्या सह्या आहेत.