सेनगाव तालुक्यातील वाढीव वीजबिल संदर्भात तसेच अपंग व निराधारांच्या पगारी अडचणी सोडवण्यासाठी तहसील कार्यालया वरती आयोजित मोर्चात सहभागी व्हा :: राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले यांचे अवाहन …

राष्ट्रवादीच्या भव्य मोर्चात सहभागी व्हा-इंगोले

सेनगांव तहसील कार्यालयावर उद्या दिनांक 27 जुलै रोजी तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या व प्रश्नासंदर्भात भव्य मोर्चा काढण्यात येणार असून आहे.तरी या भव्य मोर्च्याच्या वेळी सेनगांव तालुक्यातील नागरिकांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले यांनी केले आहे.सेनगांव महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधात तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या मागण्यासंदर्भात, शेतकऱ्यांचे पीक कर्ज आदी विषयासंदर्भात हा भव्य मोर्चा सेनगांव तहसील कार्यालयावर आयोजित करण्यात आला आहे.तरी या मोर्चावेळी वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे, पक्ष निरीक्षक श्री विजयराव भांबळे , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण,अनिल पतंगे, रवींद्र गडदे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. Ncp Youth Official – राष्ट्रवादी युवक काँग्रेस Ncp Maharashtra विजय भांबळे समर्थक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *