जिंतूरात भरदिवसा पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून
शहरातील बलसा चौकामधील चित्तथरारक घटना
संतप्त नागरिकांकडून रुग्णालयात तोडफोड

जिंतूर तालुका प्रतिनिधी/ मनोज टाक

जिंतूर शहरात सटवाई माता मंदिर परिसरातील दराडे हॉस्पिटल शेजारी पूर्ववैमनस्यातुन 21 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची चित्तथरारक घटना गुरुवार 14 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृतदेह रुग्णालयात आणल्यानंतर संतप्त नागरिकांनी रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली. अधिक बातमी..असे कि, शहरातील मिर्झा अफरोज बेग, सोमेश्वर चिकटे, योगेश दहिवाल आणि यश राठोड हे चार मित्र बलसा रोडवरील एका धाब्यावर बसलेले होते. त्यांना शहरातील राम मंदिर परिसरातील पाच ते सात जणांच्या गटाने फोनवर संपर्क साधून बलसा चौकात बोलावून घेतले. ते बलसा चौकात आल्यानंतर दोन्ही गटात पूर्ववैमनस्यातून शाब्दिक बाचाबाचीस सुरुवात झाली व काही क्षणातच शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले. राम मंदिर परिसरातील गटाने 21 वर्षीय मिर्झा अफरोज बेग याच्या पोटात आणि त्याचे मित्र सोमेश्वर चिकटे याच्या हातावर धारदार शास्त्राने वार केले व घटनास्थळावरून पोबारा केला. धारदार शस्त्राने झालेल्या चित्तथरारक हाणामारीत 21 वर्षीय मिर्झा अफरोज बेग याचा जागीच मृत्यू झाला तर सोमेश्वर चिकटे गंभीररीत्या जखमी झाले आहे. मृत्यदेह रुग्णालयात दाखल केल्यानंतर संतप्त नागरिकांनी रुग्णालयाच्या साहित्याची तोडफोड केली. काहीक्षनातच रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमा झाला होता.पोलीस उपविभागीय अधिकारी गोफणे, सपोनि कोकाटे, चौरे, पोमनाळकर, पोउपनि गाडेकर, जमादार जोगदंड, पो कॉ जिया खान आदींनी रुग्णालयात जमलेल्या जमलेल्या जमावाला आटोक्यात आणले. मारेकरुंना अटक करण्यासाठी नातेवाईकांचा ठिय्या धरला असून धारदार शस्त्राने 21 वर्षीय मिर्झा अफरोज बेग याचा निर्घृण खून करून फरार झालेल्या मारेकरुंना तात्काळ अटक करा अन्यथा मृतदेहाचा शवविच्छेदन करू देणार नाही असा आक्रमक पावित्रा घेऊन मयताच्या नातेवाईकांनी घेतला आहे. बातमी लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *