केहाळ मधुन मेंढपाळाच्या १० ते १५ मेंढया चोरी,आम आदमी पार्टी जिंतूर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले
जिंतूर तालुका प्रतिनिधी
(मनोज टाक)
जिंतूर तालुक्यातील केहळ मधून मेंढपाळाच्या 10 ते 15 मेंढ्या चोरीला गेले आहेत या साठी दिनांक १२/०७/०/२०२२ रोजी जिंतूर पोलिस निरीक्षक दांतुलवार सरांना निवेदन देण्यात आले. निवेदना द्वारे मागणी केली आहे की,आरोपींन वर लवकरात लवकर कायदेशीर कार्यवाही करावी.निवेदन देते वेळेस अड.मोहसीन पठाण तालुकाध्यक्ष आम आदमी पार्टी जिंतूर व वैजनाथ पावडे मराठवाडा अध्यक्ष मेंढपाळ मित्रमंडळ हिंगोली आणि अड. बनसोडे व इतर मेंढपाळ उपस्थित होते.
मेंढपाळ करणाऱ्या लोकांन साठी आज पर्यंत जिंतूर तालुक्यातील कोणत्याही पार्टीनं सहकार्य केले नाही मेंढपाळाच्या अळी अडचणी जाणून घेण्याची सुध्दा पर्यंत केले नाही. परंतु मेंढपाळाची फक्त या पार्टीयांनी इलेक्शनच्या वेळेस आठवण येथे.
मेंढपाळाचा फक्त वोट बँक म्हणून वापर केले जात आहे. आणि आता मेंढपाळ हे सहन करणार नाही. वेळ पडल्यास संविधानाच्या अधीन राहून धरणे आंदोलन करू असे मत अड़,मोहसिन पठान यानी व्यक्त केले, तसेच त्यांनी तालुक्यातील सर्व मेंढपाळाना विनंती केली आहे की, कोणतीही समस्या / अडी अडचणी असो. आम आदमी पार्टी जिंतूर तुमच्या पाठीशी ठाम पणे उभी आहे.