कसर येथील शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या कर्जबाजारी ला कंटाळून उचलला पाऊल

मनोज टाक जितुंर तालूका प्रतिनिधी

जिंतूर तालुक्यातील बोरी येथून जवळच असलेल्या कसर येथील बालासाहेब हनुमान मगर वय 36 वर्ष या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व शेतीच्या उत्पन्नातून उदरनिर्वाह भागत नसल्याने सोमवार दिनांक 4 जुलै रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

जिंतूर तालुक्यातील कसर येथील बालासाहेब मगर यांची कसर शिवारातील ३ एकर कोरडवाहू शेती आहे. शेतीतून कुटुंबाच उदरनिर्वाह भागत नसल्याने ते गेल्या काही दिवसापासून आर्थिक विवंचनेत होते तसेच त्यांच्यावर बोरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया चे 1 लाख 38 हजार रुपये तर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा दुधगावचे 14 हजार रुपयांचे कर्ज होते कर्ज कसे फेडावे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता.

सोमवार दिनांक 4 जुलै रोजी सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली त्यास तात्काळ बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी उत्तरी तपासणी करून मृत घोषित केली त्यांची पत्नी द्रोपदीबाई बालासाहेब मगर यांच्या फिर्यादीवरून बोरीच्या पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व चार मुली असा परिवार आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के जी पतंगे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *