औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
नितीन पोले औंढा नागनाथ तालुका प्रतिनिधी
औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. गंगासागर गजानन पोले रा. सिद्धेश्वर, ता.नागनाथ असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी पतीसह सासू-सासर्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी पती गजानन मारोतराव पोले , सासू रत्नाबाई मारोतराव पोले, सासरा मारोतराव भगवानराव पोले यांनी गंगासागर हिच्या मागे तगादा लावला हाेता, अशी फिर्याद देवराव हाके रा, पांगरा यांच्या फिर्यादीवरून औंढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला. आत्महत्या प्रकरणी गंगासागर पाेले यांच्या पतीसह सासू-सासर्याला अटक करण्यात आली आहे. तपास औंढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय लांडगे व वाळके करीतआहेत