सरसम बु येथे झाडे लावा झाडे जगवा वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली
सरसम ( बु ) ग्रामपंचायत. कार्यालयासमोर झाडे लावून उपक्रम साजरा केला

हिमायतनगर ता प्रतिनिधी दयानंद वाघमारे
हिमायतनगर तालुक्यातील सरसम ( बु ) येथे ग्राम पंचायत ने वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेतला असून आज परत ग्राम पंचायत कार्यालासमोर पन्नास झाडे लावण्यात आली व सुरुवातीपासूनच झाडांनी मनुष्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक अन्न, वस्त्र, निवारा आणि ऑक्सिजन इत्यादी गोष्टी दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर पृथ्वीवर आज जे काही आहे ते सर्व झाडांमुळेच अस्तित्वात आहे. मनुष्याला जीवनावश्यक वस्तू जसे अन्न, हवा, पाणी, दवा औषधी या झाडांकडूनच मिळतात. म्हणून म्हटले जाते की झाडे लावा झाडे जगवा. यावेळी उपस्थित सरपंच काशीबाई ठाकूर उपसरपंच अँड अतुल वानखेडे , मारोतराव मोरे नामदेव मोकासवाड अमोल कांबळे संतोष डाके सर कपील भाऊ कांबळे ज्योती गायकवाड पुष्पाताई बिचचेवार प्राजक्ता रामराव गुंडेकर रेड्डी भाऊ गायकवाड,विजय वाठोरे (पत्रकार) प्रशांत राहुलवाड (प़त्रकार)सदरील कार्यक्रम यशस्वी झाला व येथील कर्तव्यदक्ष ग्राम विकास अधिकारी राजेंद्र भोगे व झाडे लावा झाडे जगवा असा संदेश साहेबांनी दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *