जिंतूर औंढा महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ अपघात तीन जण गंभीर जखमी

जिंतूर तालुका प्रतिनिधी मनोज टाक

जिंतूर औंढा महामार्ग रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकी परस्पर भिडल्या. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली असून, जखमींना प्राथमिक उपचार शासकीय रुग्णालयात करून पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. – जिंतूर-औंढा महामार्ग रस्त्यावर आज रविवार रोजी दुपारी ४ च्या सुमारास दोन दुचाकी भरधाव वेगात परस्पर भिडल्याने झालेल्या अपघाताची माहिती महामार्ग पोलिस निरीक्षक गणेश कदम, पो.कॉ.शेख शकील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. – त्या ठिकाणी 23 वर्षीय अमर हरिभाऊ जगताप रा.पुंगळा ता.जिंतूर आणि घाटनादुर ता.आंबेजोगाई येथील रहिवासी 30 वर्षीय अनिता साहेबराव शेरे आणि 35 वर्षीय साहेबराव गोरख शेरे हे तिघे जखमी अवस्थेत आढळून आले. महामार्ग पोलिसांसह अमोल देशमुख, नागेश आकात आदींनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. – त्या ठिकाणी डॉ.गजानन काळे, गंगाधर पालवे, बालाजी नेटके, कटारे, सिस्टर शिंदे आदींनी प्राथमिक उपचार केला. दरम्यान यात साहेबराव शेरे यांच्या उजव्या पायाला गंभीर मार लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.