खिल्लार ३३ kvविद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभार पाण्याचे ढग येताच वीज होते गुल
जिल्हा प्रतीनिधी शेख खाजा
सेनगाव तालुक्यातील खिल्लार येथील विद्युत वितरण कंपनीने आपल्या मनमानीचा कळस गाठला असून त्यामध्ये पाण्याची केवळ चाहूल लागतात विद्युत वितरण कंपनीकडून आपली विजसतत गुल करण्याचा प्रकार खिल्लार परिसरात पाहावयास मिळत आहे मागील काही दिवसापासून सुरळीत वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच दिवस-रात्र वीजपुरवठा खंडित राहत आहे मागील आठ दिवसापासून ही स्थिती अधिक त्रासदायक झाली असून तास अर्धा तासला वीज पुरवठा खंडित होत असून पाण्याची चाहूल लागताच वीज पुरवठा बंद केला जातो तर रात्रभर वीज पुरवठा पूर्णपणे बंदच राहतो खिल्लार 33 के. व्ही. च्या ऑपरेटरला विचारल्यास हिंगोली वरून पुरवठा बंद केला आहे व लाईन मध्ये फॉल्ट असल्याने विद्युत पुरवठा बंद केला असल्याचे उत्तर दिले जाते या प्रकारामुळे विद्युत ग्राहकांसह सर्वसामान्य जनता हैराण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खिल्लार 33के. व्ही वरून आठ गावाला विद्युत पुरवठा केला जातो या विद्युत वितरण कंपनीने मान्सून पूर्व दुरुस्तीची कामे हाती घेण्याची गरज होती परंतु वीज वितरण कंपनीने तसे यासाठी काहीच केले नाही त्यामुळे मोठ्या पावसा अगोदरच हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्याने महावितरणच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत खिल्लार, हानकदरी, ऊमरदरी,रेपा,आडोल,पिंपरी लिंग या गावाला सुरळीत वीजपुरवठा होत नाही ही बाब वीज कंपनीच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगत आहे अशा परिस्थितीत पावसाळ्यात अनेक भागात रात्र-रात्र वीज खंडित राहते खिल्लार व परिसरातील गावातील सुरळीत वीजपुरवठाकडेही वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह वरिष्ठांचे लक्ष नाही असे असताना किमान मान्सून दाखल होण्यापूर्वी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे परंतु गावात व परिसरात दर अर्ध्या तासाला विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे तांत्रिक बिघाडाचे कारण देऊन दुरुस्तीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित ठेवला जातो ही मालिका मागील आठ दिवसांपासून कायम आहे गावात दररोज 24 तासात वीस ते तीस वेळा वीज पुरवठा खंडित होतो गावात वाढत्या विजेच्या समस्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत गावात दुरुस्तीच्या नावाखाली दररोज वीज पुरवठा खंडित केला जातो तरी सुरळीत वीज मात्र मिळत नाही खिल्लार व परिसरातील वीज बिल 90 टक्के वसुली आहे व कृषी पंपांचे 80 टक्के वसुली आहे गरीब नागरिकांचे थकीत बिल भरण्यास थोडा वेळ लागला की वीज कंपनीचे कर्मचारी मीटर पिडी करून विद्युत पुरवठा कायमचा बंद करतात नागरिक बिल भरून वीज कंपनीकडून 24 तास विद्युत पुरवठा बंद केला जातो हा कंपनीचा अजब कारभार वाढला आहे हा कारभार बंद होईल का ? वाढेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खिल्लार 33के. व्ही. च्या कारभाराकडे लक्ष देणे सोडून दिले आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे दरवर्षी खाजगी एजन्सी नेमून दुरुस्ती केली जाते परंतु त्यानंतरही बिघाड होत असल्याने खरेच ही दुरूस्तीची कामे होतात का असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत