संगमनेरमध्ये वादळामुळे भिंत अंगावर पडून तीन जण ठार, तर दोन जखमी
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर गावामध्ये असणाऱ्या मुंजेवाडी शिवारात वादळी वाऱ्याने भिंत अंगावर पडून तीन जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, मुंजेवाडी शिवारात विठ्ठल भिमाजी दुध वडे हे आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. गुरुवारी दुपारी अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दुधवडे हे कुटुंबासोबत घरात बसले होते. परंतु अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने दुधवडे यांच्या घरावरील पत्रे उडून लांबवर जाऊन पडले. या दरम्यान घराची भिंत अंगावर पडल्यामुळे विठ्ठल भिमाजी दुधवडे (वय ७५), हौसा बाई भिमाजी दुधवडे (वय ६७), साहील पिना दुधवडे (वय १०) हे जागेवरच ठार झाले. तर वनिता पिना दुधवडे ( वय ८), मंदाबाई विठ्ठल दुधवडे (वय ७०) हे जखमी झाले आहेत.