शिरूर न्यायालयाच्या परिसरात गोळीबार, नवऱ्याने पत्नी व सासुवर पिस्तुलातून झाडल्या गोळया

शिरूर न्यायालयात घरगुती केसच्या संदर्भात न्यायालयात केसच्या सुनावनीसाठी आलेल्या दिपक ढवळे (रा. ढवळगाव, ता. श्रीगोंदा, जिल्हा. नगर) (सध्या रा. अंबरनाथ, ता.ठाणे) या नवऱ्याने त्याचा भाऊ संदिप ढवळे याच्या मदतीने पत्नी व सासूवर पिस्तुलाने हल्ला चढवला.या हल्ल्यात बायको मयत झाली असून सासूवर शिरूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत महिलेचे नाव मंजुळा उर्फ मंजुश्री संदीप ढवळे, तर मयत महीलेची आई तुळसाबाई रंगनाथ झांबरे (रा. वाडेगव्हाण) या गंभीर जखमी आहेत.आरोपींना तात्काळ पाठलाग करून रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलीस निरीक्षक देविदास कंरडे, शुभांगी कुटे , पो. अंमलदार ब्रम्हा पवार, संतोष औटी, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नजिम पठाण, पोलीस अंमलदार रांजेंद्र गोपाळे, प्रविण पिठले, संतोष सांळुंके यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.