हिंगोली : भरधाव कारची दुचाकीस धडक पत्नीचा जागीच मृत्यू, तर पती जखमी

हिंगोली : हिंगोली ते कनेरगाव मार्गावरील बासंबा पाटीजवळ भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील ढोलउमरी येथील मधुकर भिवाजी कामखेडे व त्यांची पत्नी उषाबाई मधुकर कामखेडे वय ५० हे दोघे जण त्यांच्या दुचाकी वाहनावर शनिवारी रात्रीच्या सुमारास पिंपळखुटा येथे पाहुण्यांना भेटण्यासाठी येत होते.त्यांची दुचाकी वाहन हिंगोली ते कनेरगाव मार्ग बासंबा पाटी जवळ आले असताना हिंगोली कडून कनेरगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघाताय उषाबाई कामखेडे यांचा जागीच मृत्यू झाला तर मधुकर कामखेडे गंभीर जखमी झाले.शनिवारी रात्री अकरा ते साडेअकरच्या सुमारास मृत उषाबाई यांचा मृतदेह हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. तसेच जखमी मधुकर कामखेडे यांच्यावर शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहे . मात्र त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले आहे.दरम्यान या अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला . या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पिंपळखुटा येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्हि . डी.श्रीमनवार , जमादार प्रवीण राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *