असानी चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील ‘या’ भागावर परिणाम, हवामान विभागाचा गंभीर इशारा
वातावरणातील होणाऱ्या बदलांमुळे ऋतुंवरही परिणाम दिसत आहे. हवामानात सध्या अनेक बदल दिसत असून बदलत्या हवामानामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. रखरखता उन्हाळा त्यातच अवकाळी पावसाचं थैमान अशातच चक्रीवादळाचं नवं संकट त्यामुळे हवामानाची पातळी खालावली आहे.बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात तयार झालेले असानी चक्रीवादळाचं रुपांतर तीव्र चक्रीवादळात झालं आहे. अशातच आता या चक्रीवादळ वेगानं आंध्र प्रदेशच्या दिशेने, आंध्र प्रदेशात वाऱ्याचा वेग वाढला आहे. हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनडीआरएफची 50 पथकंही तैनात केलं आहे.चक्रीवादळ वेगाने आंध्रप्रदेशच्या दिशेने कूच करत आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती 12 मे पर्यंत राहण्याचा अंदाज आहे. असनीमुळे पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या तीन राज्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिन्ही राज्यांना अलर्ट जारी केला आहे.दरम्यान, चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातील कोकणात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागावर जाणवण्याची शक्यता आहे. यासोबतच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या परिसरातही असनी चक्रीवादळाचा परिमाण जावण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.