हिगोंली :- वरातीत नाचण्यावरुन वाद, वऱ्हाडी मंडळींसह नवरदेवाचे लग्न मंडपातून पलायन
हिंगोली|
लग्न समारंभ म्हटलं की सनई चौघडा, वऱ्हाड्यांची लगबग आठवते. मात्र, हल्लीच्या युगात तरुणाईला डीजे आणि बँडच्या तालावर ठेका धरण्याची क्रेझ वाढलीयेकाही ठिकाणी ही क्रेझ अंगलट येताना दिसते आहे. असाच काहीसा प्रकार हिंगोलीत घडलाय. येथे लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर वऱ्हाडी मंडळींसह नवरदेवाने थेट लग्नमंडपातून पयालय केल्याची घटनी घडलीये.
हिंगोली जिल्ह्यातल्या तळणी गावात काल विवाह सोहळा आयोजित केला होता. वराकडील वर्हाडी मंडळी उशिराने आल्यानंतर काढलेल्या मिरवणुकीत नाचण्यावरून वाद झाल्याने मारहाणीची घटना घडली. यामध्ये चौघे जण जखमी झाले. अखेर हा विवाह सोहळा झालाच नाही.
तळणी येथे गुरुवारी एक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. परंतु, वराकडील मंडळी दुपारी दीडच्या सुमारास आल्यावर त्यांनी वरात काढली. सयंकाळी चार वाजेपर्यंत ही मिरवणूक सुरूच होती. तब्बल अडीच तास वरातीत नाचूनही वरपक्ष काही थांबायला तयार नव्हता. त्यामुळे वधूकडील मंडळींनी त्यांना लवकर आटोपण्यासाठी विनंती केली.
मात्र, यावरुन वधू-वराकडील मंडळींमध्ये वाद झाला आणि पाहता-पाहता या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. ज्यामध्ये वधूकडील तीन जण आणि वराकडील एक जण जखमी झाले.
अखेर पोलिसांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली. पोलिसांनी वाद मिटवून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. तर, वराने वऱ्हाड्यांसोबत गावातून धूम ठोकली. त्यामुळे हा लग्नसोहळा अर्थवट राहिला. सध्या हे प्रकरण पोलिसांत गेले असून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.