तरुणांनी व्यसनापासून दुर राहावे सुरेश नागरे महापुरुष डोक्यावर घेण्यापेक्षा डोकक्यात घ्या नानासाहेब राऊत

चारठाणा(प्रतिनिधी शारेक देशमुख)

जिंन्तूर तालुक्यातील चारठाणा येथे क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त विश्वशांती मित्र मंडळ व सार्वजनिक जयंती उत्सव समिती चारठाणा यांच्या वतीने 9 एप्रिल रोज शनिवारी रोजी सायंकाळी 6:00 वाजता सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य संदीपदादा महाराज यांच्या सतर्कवाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष ओ.बी.सी नेते तथा काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत तर उद्घाटन म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव सुरेश भैय्या नागरे होते प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती बोरी सभापती राजाभाऊ नागरे,जि.प.सदस्य अविनाश काळे,सरपंच अनिरूध्द चव्हाण,काँग्रेस युवा तालुका अध्यक्ष राम घुगे,उपसरपंच वाजेद कुरेशी,सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड,आरोग्य अधिकारी डॉ नाईक साहेब, ग्रा.प.सदस्या दौलत देशमुख,बद्रोदीन काझी,राम चव्हाण,शिवशंकर तमशेट्टे,सलाम इनामदार,मा.उपसरपंच तहेसिन देशमुख,बाबासाहेब मेहेत्रे,दाउद अली,विष्णू वानखरे,डाॅ टापरे,उत्तम राऊत,नैमोद्दीन काझी,ईसाकदीन दादा, आदींची उपस्थिती होती या वेळी संदीपपाल महाराज यांनी विविध विषयावर जनजागृती पर मार्गदर्शन करुन श्रोत्यांना आपल्या वाणीतून मंत्रमुग्ध केले होते आपले मनोगत व्यक्त करतांना तरुण पिढीने व्यसनापासून दुर राहण्याचे आवाहन उद्घाटन सुरेश भैय्या नागरे यांनी केले तर महापुरुषांना डोक्यावर घेउन नाचण्यापेक्षा वाचुन ते डोक्यात घेण्याचे अवाहन नानासाहेब राऊत यांनी केले या वेळी विशेष म्हणजे येथिल संत जनार्दन विद्यालयाचा विद्यार्थी उध्दव शिंदे ज्याने हलाखीच्या परिस्थिती मुळे मामाने खर्च करून करुन बंगलोर युनिव्हर्सिटी येथे शिक्षण दिले व नेदरलँड येथे सेवेत समाविष्ट झाला त्याचे मामा मामी वंचळा सुधाकर भवाळे तर दुसरा विद्यार्थी विकास शिंदे याने हलाखीच्या परिस्थिती आय आय टी शिक्षण हिमाचल येथे घेउन राजस्थान येथे सेवा बजावत आसल्याने त्याच्या पालकाचा स्वागत करुन गौरव करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष नानासाहेब निकाळजे,सिध्दार्थ निकाळजे,राजाभाऊ भवाळे,महेंद्र निकाळजे, रामेश्वर निकाळजे,अविनाश भवरे,साहेबराव कांबळे, मिथुन कांबळे,रवि निकाळजे,सह सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष बुद्धरत्न भवाळे,कैलास भवाळे,मिलिंद निकाळजे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार पत्रकार प्रभाकर कुर्हे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.