शेख अर्शिया व शेख मलिक ने आपल्या जिवनातील पहिला रोजा पुर्ण केला.

माबुद खान
जिंतूर शहरातील मौलाना आझाद काॅलनी येथिल अब्दुल रशिद व शेख रफीक यांच्या नऊ वर्षीय नातू शेख अर्शिया शेख असद व सात वर्षीय शेख मलिक शेख इमदाद या चिमुकल्याने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधुन आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला आहे.
रमजान महिन्यातील रोजेला (उपवास) मुस्लीम बांधवांमध्ये अनन्य साधारण महत्व असुन या महिन्यात मुस्लीम बांधव सलग 30 दिवस रोजा (उपवास) ठेवुन विविध धार्मिक विधीद्वारे अल्हाची पुर्ण श्रध्देने आराधना करतात आणि याच महिन्यात चिमुकले ही आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात. याचीच प्रचिती म्हणुन नऊ वर्षीय शेख अर्शिया, व सात वर्षीय शेख मलिक या चिमुकल्याने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वीपने पुर्ण केला आहे. म्हणुन यांचे अजोबा शेख अब्दुल रशिद, शेख रफीक काका, शेख इबाद, शेख अजमत, शेख अताउल सौदागर व मित्र परिवार यांनी कौतुक केले