जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाचे रासेयो शिबीर प्रारंभ….
: प्रतिनिधि जिंतूर माबुद खान
जितुंर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड संलग्नित ज्ञानोपासक महाविद्यालयाचे पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्ती संवर्धन व स्वच्छ भारत अभियान विशेष वार्षिक शिबिरांचा प्रारंभ गुरुवार (दि.२४) मार्च रोजी जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी येथे इंजि. समीर गणेशराव दुधगावकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानोपासक शिक्षक मंडळ परभणी चे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार, माजी मंत्री ऍड. गणेशराव दुधगावकर, कार्यक्रमाचे उद्घाटक इंजि. समीर गणेशराव दुधगावकर व विशेष ऍड. बबनरावजी घुगे वडधुतिकर, प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे, प्रा. मुंजाजी दाभादे, सरपंच सौ. मीनाक्षीताई घुगे, उप. सरपंच सौ.शामुबाई शिंदे, पोलिस पाटील रामेश्वर कापुरे, ग्रामविकास अधिकारी संतोष काकडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. दि.२३ ते २९ मार्च या कालावधीत संपन्न होणाऱ्या या शिबिरात ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन, आरोग्य संवर्धन, जल साक्षरता, महिला उदबोधन, व्यसन मुक्ती, हागणदारी मुक्त गाव, सदभावन , एड्स जनजागृती, लोकसंख्या निर्मुलन, शैक्षणिक जागृती, कोविड लसीकरण जनजागृती, कॅशलेस व्यवहार जागृती अशी उद्दिष्टे घेऊन हे शिबीर संपन्न होणार आहे. यावेळी अध्यक्षीय समारोप गणेश रावजी दुधगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पंढरीनाथ धोंडगे यांनी केले. या शिबिरासाठी सह-कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा. डॉ. निवृत्ती पोपतवार, प्रा. संतोष कदम, प्रा. डॉ. संतोष जाधव, प्रा. डॉ. भागवत ठाकरे, प्रा. डॉ. नयना रत्नपारखी , प्रा. पांडुरंग निळे, प्रा. नारायण शिंदे, प्रा. डॉ. अजय जोंधळे हे होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, महाविद्यालयिन विद्यार्थी व आंबरवाडी गांवचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.