शिवसंपर्क अभियानाला मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहावे-संदेश देशमुख

शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपुर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचे संपर्क अभियान राबविण्यात येत आहे.दि.२२ मार्च ते २५ मार्च रोजी सेनगांव तालुक्यात ही अभियान राबवण्यात आले असून या शिव संपर्क अभियानाला मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे हिंगोली उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केले आहे.संपुर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे संघटन मजबुत बांधण्यासाठी तसेच गेल्या अडीच वर्षामध्ये शिवसेनेच्या सरकारने केलेल्या विकासात्मक कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी तसेच विरोधी पक्ष भाजपने जनतेत सरकार विषयी पसरवित असलेले गैरसमज बिनबुडाचे आरोप खोडता यावे तसेच येणाऱ्या जिल्हा परीषद,पंचायत समिती,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना एक नंबरचा पक्ष करण्यासाठी तसेच सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा असे आदेश पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नुकतेच व्हिडीओ काँन्फरन्सव्दारे झालेल्या जिल्हाप्रमुख यांच्या बैठकीत दिले आहेत.याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्याचे खा.हेमंत पाटील,हिंगोली जिल्हाप्रमुख तथा आ.संतोष बांगर तसेच शिवसेनेचे खा.संजयजी मंडलिक या संपुर्ण अभियानात मार्गदर्शन करणार आहेत.तरी तालुक्यातील जि.प.सदस्य,पं.स.सदस्य,सर्कलप्रमुख,गणप्रमुख,शाखाप्रमुख पदाधिकारी शिवसैनिक, युवासैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केले आहे.