जिंतूर-येलदरी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक

/प्रतिनिधि जितुंर तालुका

माबुद खान

जितुंर : शहरापासून हाकेच्या अंतरावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालया समोर जिंतूर-येलदारी रस्त्यावर दोन मोटरसायकल समोरासमोर भिडल्याने दोन्ही दुचाकीस्वार गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना आज (दि.२२) रोजी सकाळी ११ वा. सुमारास घडली आहे. सविस्तर वृत्त असे की संजय पवार आणि हरीश कमिटी असे दोन्ही जखमींची नावे असून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आली मागील तीन-चार महिन्यांपासून तालुक्यात अपघाताची मालिका थांबता थांबेना, त्यातच आजच्या पुन्हा अपघात होऊन त्यात भर पडल्याची दिसूनआले. जिंतूर-येलदरी महामार्गावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात समोर जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव काजळे येथील संजय पवार वय वर्ष ४५ व हरीश कामिटी रा. शेवडी वय वर्ष ३० यांच्या मोटरसायकल क्रमांक एम. एच.१५ बी. एफ. २६८० आणि एम. एच २२ डब्ल्यू ४२७४ क्रमांकाच्या दुचाकी समोरासमोर जोरात भिडल्याने झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाली आहे. यात दोन्ही दुचाकींचे ही बरेच नुस्कान झाले आहे. यावेळी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी दोन्ही जखमींना ऑटोरिक्षाच्या सहाय्याने जिंतूरशहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना परभणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.