पत्रकार रमेश देशपांडे यांना समाजभूषण पुरस्कारप्राप्त मिळाल्यानंतर नागरी जाहीर सत्कार 

 चारठाणा(प्रतिनिधी शारेक देशमुख)
आर्थिक विकास महामंडळ जालना महाराष्ट्र शासन अधिकृत सह्याद्री लोकसंचालित साधन केंद्र मंठा व मातोश्री समयी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि.८मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालय मंठा येथे मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह स्मृतिचिन्ह देऊन त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन रमेश देशपांडे यांना गौरविण्यात आले .हा पुरस्कार मिळाल्याबद्दल येथील ग्रामदैवत संत जनार्धन महाराज संस्थान येथे समस्त नागरिकांच्या वतिने रमेश देशपांडे यांचा मान सन्मान करुन नागरी जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश देशपाडे यानी सत्कार उत्तर देत मनोगत व्यक्त केले आहे.यावेळी येथील भगवानराव राऊत,ओबीसीं नेते नानासाहेब राऊत,सरपंच अनिरुद्ध चव्हाण, राम शर्मा,भाजप युवा नेते इंद्रजीत घाटुळ,डाॅ.बालाप्रसाद शर्मा,पञकार संघअध्यक्ष प्रभाकर कुर्हे,जनार्दन जोशी,विलासराव जोशी,संजय कान्हेकर,डाॅ. अंकुश हाके,डाॅ.संजय देशपांडे,बाळागुरु जोशी,माधव मुळे,अनिल देशपांडे,शेतकरी संघटना किरण चक्रपाणी,भगवानराव सोनटक्के,संभाअप्पा गजमल, रत्नाकर जोगवाडकर,गणेश देशपांडे,संजय देशपांडे,संदिप देशमुख,एकनाथ आवचार पञकार,कृष्णा सोनटक्के, आण्णासाहेब मुळे,सुधाकर जोशी,प्रमोद मुळे,गजाननथोरात, शरद भंडारी,गौरव खांडवीकर, यांच्यासह येथील परिसरातील सर्व समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.