पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे चालू देणार नाही स.पो.नि.. बालाजी गायकवाड
पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे चालू देणार नाही स.पो.नि.. बालाजी गायकवाड
चारठाणा(प्रतिनिधी शारेक देशमुख) जिंतूर तालुक्यातील चारठाणा ही संताची भूमी असुन या गावातील अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लपून छपून चालणारी अवैध धंदे चालू देणार नसल्याचे मत चारठाणा येथील पोलीस ठाण्याचा नुकताच पदभार स्वीकारणारे नूतन स.पो.नि बालाजी गायकवाड यांनी ता.८ मार्च रोजी संध्याकाळी चारठाणा पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत घेऊन सांगितले.मी जोपर्यंत चारठाणा पोलीस ठाण्यात सेवा करीत राहील तोपर्यंत जनतेचे सेवक म्हणूनच काम करणार. मी येण्याच्या अगोदर प्रभावी पणे पोलीस ठाण्या कडून कारवाई न झाल्याने नागरिकांचा ठपका ठेवण्यात आला होता. यामुळे मी माझ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे चालू देणार नाही.जर बीट जमदार अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालून अवैध धंदे लपून छपून चालू देत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही.परभणी औरंगाबाद राज्य महामार्गावरील मोठ्याप्रमाणात अपघात होतात यास आळा घालण्यासाठी महामार्गावर वळण रस्त्यावर जागोजागी फलक स्पीड ब्रेकर साईन बोर्ड स्पीड ब्रेकर वेग मर्यादा बसवण्यासाठी बांधकाम विभाग जिंतूर च्या अधिकाऱ्याला पत्रव्यवहार करून दर्शनीय फलक लावण्यासाठी प्रयत्न करणार,जेणेकरून अपघाताला आळा बसेल तसेच लटकून अवैध वाहतूक लहान वयाची मुले जर दुचाकी चालवीत असताना आढळून आल्यास त्यांच्यावरही कारवाई करणार माझ्या कार्यकाळात राजकीय कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करू नये मला जी चारठाणा पोलीस ठाण्यात काम करण्याची संधी पोलीस अधीक्षकांनी दिली त्यांच्या आदेशावर मी चारठाणा पोलीस ठाण्याच्या काम करीन असे नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. या पत्रकार परिषदेत पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभाकर कुर्हे,सय्यद मुस्ताक अहमद,रंगनाथ गडदे, अबेद देशमुख,एकनाथ चव्हाण,शारेक देशमुख,एकनाथ आवचार, सय्यद मुजीब, अमजद पठाण, सुनील चव्हाण आदींची उपस्थिती होती.