मन्नास पिंप्री येथे चाकु आणि दगडाने मारहाण करून जखमी केल्याने गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
चाकू व दगडाने मारहाण करून दिली जीवे मारण्याची धमकी दिल्याने गुन्हा दाखल मन्नासपिप्री येथील घटना
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मौजे मनासपिंपरी येथील रहिवासी असलेले इम्रान शेख सालार दि27 02 2022 रोजी सकाळी 10वाजण्याच्या सुमारास चोंडी गावापासून अंदाजे अर्धा किलोमीटर रोडवर हिंगोली कडे जाणाऱ्या सार्वजनिक रोड वर चार आरोपीने संगम मत करून दुचाकी आडवून फिर्यादीस तू कोर्टातील मॅटर मिटवतका नाही असे म्हणून चाकू व दगडाने मारून जखमीकेले व दहा हजाराचे नुकसान केले जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याच संदर्भात फिर्यादीने आपला स्वतःचा इलाज करून व नातेवाईकांची चर्चा करून स्वतः गोरेगाव पोलीस स्टेशनला दिनांक 5 रोजी हजर होऊन तोंडी फिर्याद दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणाचा पुढील तपास गोरेगाव पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे