करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना उपस्थित राहण्यासाठी बंधनकारक करा.युवक तालुकाध्यक्ष विकास गाडेकर यांची मागणी, अन्यथा आंदोलन करु

करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना उपस्थित राहण्यासाठी बंधनकारक करा.

युवक तालुकाध्यक्ष विकास गाडेकर यांची मागणी,

अन्यथा आंदोलन करु….

हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक हे आपल्या मर्जीने येत असतात त्यांच्या या अनुउपस्थित मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्याची वाट लागत आहे, गोरगरीब सर्वसामान्यांचा विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची परीस्थिती नसते त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला जातो परंतु या करंजी गावातील शाळेत शिक्षक सतत उपस्थित राहत नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, ज्या दिवशी त्यांना यायचं आहे त्या दिवशी १० वाजता न येता ११-१२ वाजे पर्यंत येतं असतात सद्या करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा घंटा शिक्षकांच्या वेळे नुसार वाजत आहे,अशा हलगर्जीपणामुळे लहुजी शक्ती सेनेचे युवक तालुकाध्यक्ष विकास गाडेकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले व तालुका शिक्षण अधिकारी यांनी तात्काळ या विषयावर लक्ष केंद्रित करून सदर शाळेच्या शिक्षकांना उपस्थित राहण्यासाठी बंधनकारक करावे,उपस्थित राहत नसल्यास त्यांची बदली करून त्या ठिकाणी नवीन शिक्षकांची नेमणूक करावी असे न केल्यास येणाऱ्या काही दिवसांतच लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य हिमायतनगर तालुक्याच्या वतीने आपल्या कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा लहुजी शक्ती सेनेचे युवक तालुकाध्यक्ष विकास गाडेकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.