गोरेगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लपून छपून चालणारे सर्व अवैध धंदे बंद करा

गोरेगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लपून छपून चालणारे सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करा.अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा नितीन संजय कावरखे यांचा इशारा.हिंगोली जिल्ह्यातील गोरेगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच गोरेगांवात परीसरात लपून छपून चालणारे सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत यासाठी दिनांक 20 /2/22 रोजी गोरेगाव पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.यांची अधिक माहिती अशी की गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बोकाळले असुन स्थानिक पातळीवर व परीसरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर ‌वाढल्यामुळे गावात अशांतता प्रस्थापित होत आहे . परिणामी कायदा – सुव्यवस्था बोकाळत चालली आहे . रहदारीच्या मुख्य रस्त्यावर आंबट – शौकिनाचा हैदोस सुरु रोजच बघायला मिळत आहे तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये ‌व कालेज मध्ये शाळकरी मुलांना तसेच सर्व सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करण्याची वेळ येत आहे . गावातच पोलीस ठाणे असून सुद्धा अवैध देशी – विदेशी तथा मटका व्यवसाय लपून छपून चालविला जातो . परंतु याकडे गोरेगांव पोलिसांचे अर्थ पुर्ण दुर्लक्ष होत असल्याने गावात अवैध धंदे पुन्हा जोमात सुरू केल्या जात आहे .असा प्रश्न सर्वसामान्य महिला वर्गातून होत आहे . पोलीस ठाण्याच्या हद्दीत विदर्भातून अवैध देशी दारू विक्री तसेच पार्सल गावोगावी जाऊन पोहचवत आहे . त्यामुळे प्रत्येक गावात दोन – तीन अवैध देशी दारूची दुकाने थाटली आहे . त्यामुळे अनेकांचे संसार उधवस्त होत आहेत . एवढेच नव्हे तर युवा वर्गही व्यसनाधीनतेकडे वळत असल्याचे दुर्दैवी चित्र बघावयास मिळत आहे . गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करावेत असे निवेदन देण्यात आले आहे. गोरेगांव आणि परीसारतील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांना आळा घालून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर आणि कडक कार्यवाही करावी अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आहे व अवैध धंदे तात्काळ बंद करावे तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालय समोर उपोषणास बसणार असल्याचे नितीन संजय कावरखे यांनी इशारा दिला आहे.न्यूज महाराष्ट्र नेटवर्क साठी गजानन धुळधुळे हिगोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *