चैन स्नॅचींग करणाऱ्या ईरानी टोळीतील दोघांना हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक आरोपीकडुन चोरी केलेल्या सोन्याच्या वस्तू असा एकूण 1 लाख 36 हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी केला जप्त. हिंगोली शहरात 10 जानेवारी रोजी पोलीस स्टेशन शहर हद्दीतील शिवाजीनगर परिसरात एक महिला रस्त्याने जात असताना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मोटरसायकल वरील दोन अज्ञातांनी मोटरसायकल भरधाव वेगाने जवळ आणून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्ती हिसकावून चोरटे पसार झाले होते यासह इतर ठिकाणी चोरट्यांनी अशा चोरीच्या घटना केल्या होत्या पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन सहायक पोलिस अधीक्षक यतिष देशमुख यांना योग्य सूचना देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांना गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करून चोरट्यांचा शोध घेत पाठविण्यात आले होते पोलीसांनी सिसीटीव्ह फुटेज वरुन चोरांचा तपास केला असता चैन स्नॅचिंग करणाऱ्या ईरानी टोळीतील हे दोघे जण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीसांनी योग्य तपास करत कर्नाटक राज्यातील बिदर येथील ईराणी टोळीतील घोड्यांना आटक केली असुन त्यामध्ये जाफर हुसेन आझम हुसेन वय 22वर्ष ,समीर अली रीयाज आली वय 23वर्ष दोघं आरोपी कर्णाटक राज्यातील बिदर येथील रहिवासी आहेत या दोघां आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने असा 1 लाख36 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चैन स्नॅचिंग करणाऱ्या ईरानी टोळीतील आरोपींना पकडण्यासाठी विशेष कामगिरी करावी लागली.