पाथरी जिल्हा परिषदेच्या पाचही सर्कलवर भगवा फडकवणार.- खासदार बंडू जाधव साहेब.
अजहर शेख हादगावकर
पाथरी जिल्हा परिषदेच्या पाचही सर्कलवर भगवा फडकवणार.- खासदार बंडू जाधव साहेब.हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसंवाद मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातील गावा-गावांमधील शिवसैनिकांच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहे तसेच तेथील विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे.खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आज या मोहिमेची पाथरी तालुक्यात सुरुवात झाली, ‘शिंदे मळा’ कानसुर येथे तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत हा शिवसंवाद दौरा संपन्न झाला. यानिमित्ताने खासदार साहेबांनी सर्व शिवसैनिकांना आगामी निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले. पाथरी तालुक्यातील सर्वच्या सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भगवा फडकवण्याचा शब्द त्यांनी दिला. यासाठी मी कुठेही कमी पडणार नसून सर्वांच्या सहकार्याने परिवर्तन घडवीत परभणी जिल्हा परिषदेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करू असाही विश्वास त्यांनी दिला.यावेळी शिवसेना नेते डॉ. राम शिंदे यांनी पाचही सर्कलमधील सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, शिवसैनिक यांना आगामी वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन केले. मागील दोन वर्षाच्या काळात ठाकरे सरकारच्या माध्यमातून झालेली विविध विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रत्येक शिवसैनिकांनी करावे असे आवाहन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला साद देत हा दौरा आयोजित करण्यात आला असून या शिव संवाद मोहिमेच्या झंझावातामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व नवचैतन्याचे वातावरण तयार झाले आहे असे सांगितले. खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितच शिवसेनेचा सर्व सर्कलवर विजय मिळवू अशी ग्वाही दिली.यावेळी जिल्हाप्रमुख सुरेशबाप्पा ढगे, उपजिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे, तालुका प्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, युवासेना जिल्हा प्रमुख दीपक बारहाते, युवासेना उपजिल्हाप्रमुख मनोज भिसे , युवासेना तालुकाप्रमुख पांडुरंग शिंदे, सोनपेठ तालुकाप्रमुख भगवान पायगन, जिल्हा परिषद सदस्य माणिकआप्पा घुमरे, रंगनाथनाना वाकणकर, पंचायत समिती सदस्य, पिंकुभैया शिंदे, शरद कोल्हे इतर पदाधिकारी व शिवसेना युवासेना सैनिक उपस्थित होते.