गुरुदक्षिणा लघुचित्रपट मा. शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या शुभहस्ते रिलीज करण्यात आला

हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या जांभरून तांडा येथील नवोपक्रमशील शिक्षक राजकुमार मोरगे सर यांचा ” गुरुदक्षिणा ” हा लघुचित्रपट मा. शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड मॅडम यांच्या शुभहस्ते रिलीज करण्यात आला. सोबतच या चित्रपटाचे अतिशय आशयपूर्ण पोस्टर यावेळी लॉंच करण्यात आले. शिक्षक केवळ ज्ञानच करतो असे नाही तर त्याला सर्व भूमिका शाळेच्या रंगमंचावर सादर करावे लागतात हेच या चित्रपटातून दाखवत शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील आदर , प्रेम , जिव्हाळा अतिशय भावूक वातावरणामध्ये चित्रित केला आहे. ज्ञानदानाचे अविरत कार्य करणारे मोरगे सर हे बहुगुणी व्यक्तिमत्व असणारे आहेत. लॉकडाउन च्या काळात त्यांचा ” राजमन ” हा ई- चारोळी संग्रह व ” तू थेंब भरल्या नभातला ” हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. साहित्य, संगीताची आवड असणाऱ्या मोरगे सरांनी स्वतः लिहलेले गीत देखील महाराष्ट्रभर पोचले आहे. राज्य व देश पातळीवरील विविध मासिक , दिवाळी अंक यांच्यात लेख , कविता , कथा लेखन करत असतानाच *यु.एस. ए. ( अमेरिका ) व ऑस्ट्रेलिया* या देशातून प्रकाशित होणाऱ्या *हम हिंदुस्थानी* हिंदी सप्ताहिकातून त्यांनी लेखन करत *आंतरराष्ट्रीय पातळीवर* आपले साहित्य पोचविले आहे. * लेखक, कवी, गीतकार, कलाकार व निर्माता अशा सर्व भूमिका साकारत यशाला गवसणी घालण्यात ते कधीच कमी पडले नाहीत. सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.यावेळी पालकमंत्री तथा शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड मॅडम सोबतच , आमदार टारफे साहेब, जि प सदस्य संजयजी दराडे , वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथजी कुटे, , व इतर मित्रमंडळ यांनी उपस्थित राहून अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *