सेनगाव मंठा नगरपंचायत निवडणूकात सर्वाधिक भाऊकी निवडुन आले
राजकारणात भाविकाचा वाद मोठा कठीण, काहीही झाले तरी भावकीतल्या माणसाला आडवं जायचं हे ठरलेलंच. (Hingoli) पण आता हा समज काही प्रमाणात का होईना खोटा ठरतांना दिसत आहेनुकत्याच जाहीर झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत मराठवाड्यातील अनेक गावांत एकमेकांशी भावकी, नातेसंबंध असलेले उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव नगरपंचायतीत देशमुख नावाचे तब्बल ९ नगरसेवक विजयी झाले आहेत. वेगवेगळ्या पक्षाकडून निवडूक लढलेले हे एकमेकांचे नातेवाईक, जावा, काका-पुतणे, सासू-सून आहेत. त्यामुळे पुढचा काळ नगरपंचायतीत देशमुखीच चालणार हे स्पष्ट आहे.आम्ही कुठल्याही पक्षात असलो तरी विकासाआड आमचे राजकारण येवू देणार नाही. जनतेने ज्या अपेक्षेने आम्हाला निवडून दिले, त्यांच्या विश्वासाला पात्र ठरू,असा विश्वास देखील हे सर्वजन सेनगाववासियांना देत आहेत.
असाच काहीसा योगागोग जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात देखील जुळून आल्याचे पहायला मिळाले आहे. मंठा नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला इथे बहुमतासह सत्ता मिळाली. शिवसेनेचे १७ पैकी १२ नगरसेवक इथे विजयी झाले आहेत.नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचीच `पंचाईतविशेष म्हणजे यापैकी ८ नगरसेवक हे बोराडे कुटुंबातील आहेत. पैकी ७ एकट्या शिवसेनेचे तर एक भाजपचा नगरसेवक आहे.
अशीच काहीशी स्थिती जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी नगरपंचायतीत देखील पहायला मिळते.तीर्थपुरी नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता आली असून विजयी झालेल्या नगरसेवकांमध्ये सर्वाधिक ७ हे चिमणे आडनावाचे आहेत. तर चार नगरसेवक हे बोबडे नावाचे आहेत.