सोमवार पासुन शाळा सुरू होनार,शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यानी दिले सकेंत
राज्यात कोरोना आणि कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेतवाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेले शाळा आणि महाविद्यालये पुन्हा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र आता पालक संघटनांकडून शाळा सुरू करा अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे.’पालक संघटनांकडून शाळा सुरू करा अशी मागणी होत असल्याने सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवणार आहे.’ अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘सोमवारपासून शाळा सुरू करण्यात याव्यात असा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे ठेवणार आहोत. रुग्णसंख्या कमी होत आहे जी सकारात्मक गोष्ट आहे त्यामुळे पालक सतत शाळा सुरू करा अशी मागणी करत आहेत. नियम धुडकवून काहीही करणं चुकीचं आहे, पण मुख्यमंत्र्यांचा निर्णय येऊ द्या.’ असं त्या म्हणाल्या.पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘लसीकरणावर अधिक भर देणार आहोत.आरोग्य विभागाशी याबाबत चर्चा करण्यात येईल.शाळेत लसीकरण केंद्र झाले तर लवकर लसीकरण पूर्ण होईल.रात्रशाळांच्या बाबतीतही निर्णय घेऊ, अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे.