हिंगोली जिल्ह्यात 56 नवीन कोविड -19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

हिंगोली जिल्ह्यात 56 नवीन कोविड -19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे .

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 04 व्यक्ती , वसमत परिसर 17 व्यक्ती , कळमनुरी परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 08 व्यक्ती , वसमत परिसर 10 व्यक्ती , कळमनुरी परिसर 04 व्यक्ती , औंढा परिसर 03 व्यक्ती व सेनगाव परिसर 09 व्यक्ती असे एकूण 56 कोविड -19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत . तर आज 13 कोविड -19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे . आयसोलेशन वार्डामध्ये भरती असलेल्या रुग्णांपैकी 02 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन चालू आहे . जिल्ह्यात आजपर्यंत कोविड 19 चे एकूण 16 हजार 399 रुग्ण झाले असून , त्यापैकी 15 हजार 744 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे . तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 259 रुग्णांवर उपचार सुरु आहेत . तसेच कोविड -19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 396 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.