आपणच आपले मित्र व आपणच आपले शत्रू -आ.बाबाजानी दूर्राणी

पाथरी/ प्रतिनिधी :– अहमद अन्सारी पाथरी परभणी मो.7218275486. : दारू आणि अन्य व्यसन केल्याने आपले व आपल्या कुटुंबाचे नुकसान होते.आपणच आपले मित्र किंवा आपणच आपले शत्रू असतो.आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन सुखी बनवायचे का? दुःखी हे प्रत्येक व्यक्तीच्या हातात आहे.गरज आहे फक्त चांगल्या मानसिकतेची.निर्व्यसनी होऊन जीवन जगण्याची. एक काळ असा होता की,

माळीवाडा या प्रभागांमध्ये एखाद दुसरी व्यक्ती दारू प्यायची आणि गपचूप झोपायची. गल्लीतील लोकांच्याही लक्षात येत नसायचे की सदरील व्यक्तीने दारू प्याली आहे . परंतु आता बरेच नवतरुण दारू पिऊन आपल्या सुसंस्कृत माळीवाडा परिसराचे नाव बदनाम करत आहेत.

हे सर्व थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक असून,आपल्या पाथरी शहरातील माळीवाडा प्रभागातील सर्वांगीन विकास साधणे गरजेचे आहे. त्यासाठी मी पूर्ण मदत करायला तयार आहे. असे प्रतिपादन आ.बाबाजानी दुर्राणी यांनी माळीवाडा प्रभागांमधील विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी केले.

आज दि.५ नोव्हेंबर,२०२१ रविवार रोजी, माळीवाडा येथील नगरसेवक विठ्ठल दादा रासवे यांच्या निधीतून पेवर ब्लॉक, अंडरग्राउंड नाल्या व इतर विविध लाखो रुपयाच्या विकास कामाचे उद्घाटन आ.दूर्राणी आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

यावेळी कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून मुंजाभाऊ भाले पाटील, सुभाष आबा कोल्हे, कलीम अन्सारी, दत्ताराव मायंदळे,कायदेपंडित बालासाहेब नाईक, विशुद्धानंद वैराळ, चक्रधर उगले,पी.टी नाईक, सुभाष चिंचाणे सर, रामराव वांगीकर, शिवाजी चिंचाणे, हन्नान मामा दूर्राणी, नितेश भोरे, अनिल पाटील,

कल्याण चौधरी,सुखदेव काका चिंचाणे, सुनील उन्हाळे, साहेबराव मानोलीकर, युसूफद्दीन सेठ अन्सारी, मुस्तफा टेलर, गुलाम मुस्तफा अन्सारी, नारायण पितळे, राजू पामे,नसीर तात्या, अजय पाथरीकर,हसीब खान, मधुकर काळे, गोविंद हरकळ, रंगनाथ विरकर, अनिस फारुकी, रिंकू पाटील इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात आ.बाबाजानी दुर्राणी यांनी विविध विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. विकास कामांचा कार्यक्रम असतानाही वेळेची गरज म्हणून युवकांना नशामुक्त राहण्याचे मार्गदर्शनही केले. यावेळी सर्वच ऐकणारे श्रोते मंत्रमुग्ध झाल्याचे दिसले.

युवकांनीही दारू सोडण्याचा संकल्प यावेळी केल्याचे कळते. तशी चर्चाही कार्यक्रमाच्या ठिकाणी ऐकायला मिळाली. यामुळे निश्चितच नगरसेवक विठ्ठल दादा रासवे यांचा आजचा कार्यक्रम संपूर्णपणे यशस्वी झाला असे म्हणता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *