फुलंब्री येथे भाजपा महिला मोर्चाच्या दिनदर्शिकेचे विमोचन
प्रतिनिधी / (प्रविण एखंडे)
फुलंब्री येथे भाजपा महिला मोर्चाच्या दिनदर्शिकेचे विमोचन राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगरपंचायत कार्यालयात माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरीभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.नगरपंचायत कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते तालुका भाजपा महिला मोर्चाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती तालुकाध्यक्ष सुहास शिरसाठ, भाजपा महिला तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्या ऐश्वर्या अभिषेक गाडेकर, मंगलाबाई वाहेगावकर, सरसाबाई वाघ, रत्ना सोनवणे,सविता नवले, राणी सोनवणे,जानकी काळे,सुशिला फुके, गजानन नागरे, योगेश मिसाळ, बाळासाहेब तांदळे,अभिषेक गाडेकर, संजय त्रिभुवन, सुचित बोरसे, वाल्मिक जाधव, राजेंद्र वाघ, अजय नागरे, अजय शेरकर व आदी नगरसेवक, नगरसेविका, पंचायत समिती सदस्य,पदाधिकारी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.