आ. संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत औंढा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मोठ्या जल्लोषात दाखल !!!
औंढा शहरात केलेल्या विकास कामाच्या जोरावर शिवसेना स्पष्ट बहुमत मिळवेल
– आ. संतोष बांगर
बालाजी पांचाळ हिंगोली जिल्हा प्रतिनिधी : हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत औंढा नागनाथ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकी साठी शिवसेनेच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मोठ्या जल्लोषात दाखल करण्यात आले,
यावेळी बोलताना आमदार संतोष बांगर म्हणाले की शिवसेनेने औंढा नागनाथ शहरात व तीर्थक्षेत्र नागनाथ संस्थानात केलेल्या विकासकामांच्या जोरावर औंढा नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना स्पष्ट बहुमत मिळवेल असा ठाम विश्वास व्यक्त केला यावेळी उपजिल्हाप्रमुख जी डी मुळे, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,
अनिल भाई देशमुख, तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख,श्रीराम दादा राठी,जसवंत काळे,कय्युम शेख, बंडू चोंढेकर,अनिल देव,राहुल दंतवार, शंकर यादव, प्रदीप कणकुटे,तांबोळी नदिमा फातिमा, विष्णू पवार ,कपिल खंदारे, राम मुळे, शे.सिद्दीक,जाधव शीला तुळशीराम, प्रमोद देव, गणेश देशमुख,शिंदे शारदा अनिल मनोज काळे,दिलीप राठोड,मनोज जवळेकर,गंगाधरराव पोले,माधव गोरे,सचिन राठोड,लल्ला देव व मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंगोली जिल्ह्यातील जाहिरात बातम्यासाठी संपर्क बालाजी पांचाळ 9529109978 / 9309921233