पूर्णा तालुक्यात विष प्राशन करून नवविवाहित दाम्पत्याने जिवनयात्रा संपोवली
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका नवविवाहित दाम्पत्याने भयावह पद्धतीने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.शनिवारी रात्री त्यांनी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. रविवारी सकाळी दोघंही आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले आहेत. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती पूर्णा पोलिसांना दिली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. गंगाधर विश्वनाथ चापके वय 25 आणि सपना गंगाधर चापके वय 21 असं मृत पावलेल्या नवविवाहित दाम्पत्याचं नाव आहे. ते पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथील रहिवासी होते. आठ महिन्यांपूर्वी दोघांचा विवाह झाला होता.पण काल सकाळी दोघंही मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. आत्महत्येच्या कारणाचा शोध पूर्णा पोलीस घेत आहेत.