राज्यातील या जिल्ह्यांमध्ये उद्या पावसाची शक्यता

राज्यात आजपासून पुन्हा एकदा पाऊस पडणार आहे, अशी माहिती ज्येष्ट हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी या संदर्भातील ट्विट केलं आहे. राज्यात डिसेंबर महिन्यात ३ ते ४ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार.पावसाने हजेरी लावली होती यंदा राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली होती, तर २७ डिसेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या. तर पुन्हा एकदा राज्यात पाऊस पडणार हवामान विभागाने दिली आहे. उद्या राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे.राज्यातील धुळे,नंदुरबार , जळगाव, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडसणार आहे. तर राज्यात रविवारी म्हणजेच ९ जानेवारी ला राज्यातील विदर्भ भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. राज्यातील विदर्भ भागातील नागपूर, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गारपीट पडणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *