हिंगोली :-दिनांक 05 /01/2022 येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हिंगोली श्री. पी. व्ही. बुलबुले साहेब यांनी आरोपी रियाज नाईक अब्दुल वाली नाईक यांची आज रोजी शासकीय कामात अडीअडथळा व शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण या खटल्यात निर्दोष मुक्तता केली आहे. याबाबतची थोडक्यात हकीकत अशी की फिर्यादी राजू अशोक साळवे तात्कालीन क्षेत्रीय अधिकारी नगर परिषद कळमनुरी यांनी पोलीस स्टेशन कळमनुरी येथे फिर्याद दिली होती, स्थळ पाहणीच्या रिपोर्ट ची नक्कल आत्ताच दे असे म्हणून आरोपी यांनी फिर्यादीस अश्लील शिवीगाळ केली व गालात थापड-बुक्क्यांनी मारहाण केली आणि डाव्या हाताच्या मनगटावर चावा घेतला अशा प्रकारे फिर्यादीच्या शासकीय कामात अडीअडथळा केला सदरील प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपपत्र मा.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली यांच्याकडे दाखल केले होते. आरोपी यांच्यामार्फत ॲड. जे. एस. पठाण यांनी आरोपीची न्यायालयात बाजू मांडली सदरील प्रकरणात फिर्यादी कडून एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीच्या वतीने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या समक्ष ॲड. जे. एस. पठाण यांनी युक्तिवाद केला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. पि. व्ही. बुलबुले साहेब यांनी आरोपीचा बचाव स्वीकार करून सरकारी पक्ष हा खटला सिद्ध करू शकला नाही त्यामुळे आरोपी यांची दिनांक 5/1/2022 रोजी निर्दोष मुक्तता केली. सदरील प्रकरणातील आरोपीच्या वतीने ॲड. जे. एस. पठाण यांनी काम पाहिले व त्यांना ॲड. सिराज एस. खान यांनी सहकार्य केले